May 25, 2007
महामुंबई

 
 
मुंबईच्या कॉलेजांमध्ये आता 'ई-ग्रंथालये'!



म. टा. प्रतिनिधी

एमआयटी , स्टँडफर्ड , कॉनेर्ल आदी जागतिक स्तराच्या विद्यापीठांप्रमाणे इंजिनीअरिंग , मॅनेजमेंट आदी विषयांशी संबंधित संदर्भ पुस्तके इंटरनेटवरच ' ऑनलाइन ' देण्याचे तंत्र मुंबईतील कॉलेजांतही विकसित होत आहे. ई-लर्निंग क्षेत्रात सेवा पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांनी या क्षेत्रातील संधी हेरत मुंबईतील काही कॉलेजांना ही सुविधा पुरवत आघाडी घेतली आहे.

एप्रेस , आयबीएम रेडबुक , मॅग्रा-हिल , मायक्रोसॉफ्ट प्रेस , एमआयटी प्रेस , ऑस्बॉर्न , सायबेक्स , अॅमॉकॉम , हार्वर्ड बिझनेस स्कूल प्रेस अशा अनेक दजेर्दार प्रकाशन संस्थांची मॅनेजमेंट , इंजिनीअरिंग , कॉमर्स आदी विषयांची पुस्तके कॉलेजांमध्ये मिळत आहेत. यामुळे , एकाचवेळी हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयांशी संबंधित पुस्तकांवरून अभ्यास करणे शक्य होणार आहे.

यापैकी अनेक पुस्तके हजारो रुपये किमतीची आहेत. अनेक पुस्तके ग्रंथालयात मिळत नाहीत. याउलट विद्यार्थ्यांची या पुस्तकांची मागणी मोठी आहे. त्यातूनच ही संकल्पना भारतात राबवण्याचा निर्णय झाल्याची माहिती ई-लनिर्ंग सेवा पुरवणाऱ्या ' २४ ३ ७ ' या कंपनीचे संचालक अनिल चिकारा यांनी दिली. ' २४ ३ ७ ' तफेर् ' बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्स ' ( बिट्स पिलानी) या कॉलेजातील मुंबई , गोवा आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीच्या (आयएमटी) नागपूर , दुबई कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना ही सुविधा पुरवण्यात येत आहे.

पाठ्यपुस्तकांबरोबरच विद्याथीर्-शिक्षकांना संबंधित विषयाविषयी अधिक ज्ञान मिळवायचे असेल , तर ही ' ई-ग्रंथालये ' निश्चितच उपयोगी ठरतील , असे बिट्स पिलानीच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि एज्युकेशन टेक्नॉलॉजी युनिटचे प्रमुख डॉ. राहुल बजाज यांनी सांगितले.

यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे २५० ते ५०० रुपये इतका खर्च येणार आहे. बिट्स पिलानीचे १० हजार रुपये आणि आयएमटीच्या एकूण १४ हजार विद्यार्थ्यांना या सेवेचा लाभ मिळेल.